सायकलिंग @ सिंहगड @ ६८ की.मी. आणि हायकिंग @ ७ किमी..

सायकलिंग @ #६८किमी आणि #हायकिंग @ #७किमी..

नमस्कार मैत्रहो ...

पुन्हा एकदा दुसऱ्या संक्रमनातील कोरोना च्या गढूळ आणि निगेटिव्ह वातावरणात आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ( आशावादी ) ठेवायचे असेल, आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल, आपली ईच्छाशक्ती प्रबळ करायची असेल आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला रोजच्या रोज जमेल तसे योगासने, व्यायाम, सायकलिंग, हायकिंग, ट्रेकिंग वगैरे प्रकार करायला हवेत जेणेकरून आपल्यात पॉझिटिव्ह बदल घडू शकतो, आपल्यात कोरोना सारख्या नकारात्मक रोगावर मात करण्यासाठी सकारात्मक बल निर्माण होतो .. !!

आणि आमच्या सारख्या भटक्यांना तर या अशा वेळी सांगायलाच नको ... !! ☺️👍

मागील १० दिवसांत, मस्तपैकी दोनदा कात्रज घाट ( जुना बोगदा ) च्या पल्याड सायकलिंग आणि कात्रज डोंगरावर हायकिंग झाले तसेच मोरया गोसावी चिंचवड ला सायकलिंग झाले आणि कालची राईड तर एकदम भन्नाटच झाली .... !! ☺️👍


काल पहाटेच आम्ही नेहमीची मित्रमंडळी ठरल्या प्रमाणे, दोघे आपापल्या सायकली घेऊन कसब्यातून ( #दीपक_हिरवे अन #अस्मादिक ) निघालो, आणि थेट सिंहगड रोड ला लागलो, पुढे राजाराम पुलापाशी मात्र नव्यानेच आमच्या चमुमध्ये दाखल झालेला कोल्हापूर चा अतिउत्साही आणि विलक्षण झपाटलेला प्राणि, आणि या दोन पायाच्या प्राण्याचे विशेष म्हणजे हेच की या पठयाने निव्वळ एक वर्षांपूर्वी आयुष्यात प्रथमच शाळा सोडल्या नंतर सायकलिंग सुरू केली होती तेही आमच्या सोबतीने खडकवासला परिक्रमा करून, त्यावेळी याला का आपण घेतले असे आम्हाला झाले होते त्याच या प्राण्याने स्वतः मध्ये येवढा आमूलाग्र बदल घडवून आणला आहे, की आता हा पठया, अगदी हसत-खेळत दिवसाला २०० - २०० किमी ची  राईड्स सहज मारू शकतो, अगणित मोठमोठ्या राईड्स याने मारल्या आहेत, ज्या आम्ही नाही मारू शकलो, स्वतः चे वजन ९६ वरून ८६ किमी वर आणले आहे, एक प्रचंड सायकलिंग चे वेड डोक्यात भरून, भारून घेतले आहे,  तर असा हा आमचा नरवीर मित्र, कोल्हापूर चा ढाण्या वाघ,  #रमेश_पोवार आम्हाला जॉईन झाला आणि सोबत नेहमीचे आमचे चिरतरुण, हरहुन्नरी मित्र #अतुल_देव देखील सहभागी झाले .. !!

त्यांचे सोबत पुढे निघालो अन सर्वात शेवटी, आमचे उत्साही बंधू #हेमंत_पिलाने धायरी जवळ, अभिरुची मॉल पाशी आमच्यात सहभागी झाले ..!! ☺️👍


मग काय, ५ ही जण मजल दरमजल करत खडकवासला धरणापाशी थांबलो, तेथून एकजण कामाला जायचे म्हणून माघारी निघाला अन आम्ही चौघे तसेच पुढे सुसाट निघालो, सिंहगड पायथ्याला सायकली पार्क केल्या, थोडीशी पोटपूजा केली अन मग हायकिंग ला सुरुवात केली, आणि आमचा दैवयोग असा की अगदी सिंहगड चढाई ला सुरू करतानाच, आम्हांला आमचे रोलमोडेल म्हणा, ट्रेकिंग क्षेत्रातील एक महान व्यक्ती, गिरिप्रेमी संस्थेची सर्वेसर्वा, #उषप्रभा_पागे मॅडम भेटल्या, त्यांचे चरणस्पर्श करून दोन शब्द बोलून मग मोठ्या आनंदाने अन उत्साहाने हायकिंगची मजा घेत सिंहगडा च्या चिरपरिचित वाटेवरून सिंहगड टॉप ला गप्पा मारत कधी पोचलो ते कळाले देखील नाही, कर्मधर्म संयोगाने, गडावर मुळीच गर्दी नव्हती,  मग टॉप वर मस्तपैकी २-२ ग्लास लिंबुशरबत पोटात ढकलून त्वरित परत माघारी फिरलो त्यावेळी मात्र सूर्यदेव पाठीवर मोठ्या प्रेमाने आग ओकू लागला होता ... !! ☺️👍


पायथ्याला येऊन, आपापल्या सायकली घेऊन, ११ ते १२ दरम्यान च्या कडक चांदण्यांत नहात, घामाच्या सहस्त्र धारा अंगावरून निथळत ठेवत  मग मात्र नॉनस्टॉप आपापली घरे गाठली आणि एक परिपूर्ण असा सायकलिंग @ ६८ किमी आणि हायकिंग @ ६.५ किमी @ सिंहगड टॉप असा एकूणच खुप छानसा मनाला विलक्षण उत्साह आणणारा असा कार्यक्रम पूर्ण झाला ..! !

पुन्हा भेटू यात असेच एखाद्या आडवळणावर .. !

तोपर्यंत आता पुढे कोरोना आपले काय रंगरूप दाखवतो देव जाणे, आपण मात्र अतिशय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आलेल्या संकटाला सामोरे जायचे येवढेच करू शकतो .. !! 

#ट्रेकिंग_करा..
#चिरतरुण_रहा.. 
#सायकल_चालवा.. #पर्यावरण_वाचवा..
#झाडे_लावा..
#पर्यावरण_वाचवा..

🚴‍♂️🚴‍♂️🧗‍♂️🧗‍♂️🌳🌿

#प्रविण_दुधाने..
#किल्ले_सिंहगड..
#एक_सह्यवेडा..
#फक्त_सह्याद्री..
#हॅपी_ट्रेकर्स_फॉरेव्हर_गृप..
#फक्त_मराठा_गृप..
#ट्रेकिंग_अँड_सायकलिंग..
#सायकल_मित्र_परिवार..
#धर_हँडल_मार_पॅडल_ग्रुप..
#सह्याद्री #भटकंती #सह्यकडा..
#सायकलिस्ट..
#महाराष्ट्र #महाराष्ट्रदेशा..
#आम्ही_भटके #महाराष्ट्रदेशाचे..
#महाराष्ट्रमाझा..
#मी_महाराष्ट्राचा..
#जय_शिवराय_जय_महाराष्ट्र..
🙏🏻😌🙏🏻😔🙏🏻😌🙏🏻

                                      एक भटक्या ...
                                      ब्लॉगर प्रविण दुधाने ..
                                      मो. नं.  ९८८१००१९५७
                                         

Comments