सायकलिंग @ सिंहगड @ ६८ की.मी. आणि हायकिंग @ ७ किमी..
सायकलिंग @ #६८किमी आणि #हायकिंग @ #७किमी.. नमस्कार मैत्रहो ... पुन्हा एकदा दुसऱ्या संक्रमनातील कोरोना च्या गढूळ आणि निगेटिव्ह वातावरणात आपल्याला स्वतःला पॉझिटिव्ह ( आशावादी ) ठेवायचे असेल, आपला आत्मविश्वास वाढवायचा असेल, आपली ईच्छाशक्ती प्रबळ करायची असेल आणि आपली प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला रोजच्या रोज जमेल तसे योगासने, व्यायाम, सायकलिंग, हायकिंग, ट्रेकिंग वगैरे प्रकार करायला हवेत जेणेकरून आपल्यात पॉझिटिव्ह बदल घडू शकतो, आपल्यात कोरोना सारख्या नकारात्मक रोगावर मात करण्यासाठी सकारात्मक बल निर्माण होतो .. !! आणि आमच्या सारख्या भटक्यांना तर या अशा वेळी सांगायलाच नको ... !! ☺️👍 मागील १० दिवसांत, मस्तपैकी दोनदा कात्रज घाट ( जुना बोगदा ) च्या पल्याड सायकलिंग आणि कात्रज डोंगरावर हायकिंग झाले तसेच मोरया गोसावी चिंचवड ला सायकलिंग झाले आणि कालची राईड तर एकदम भन्नाटच झाली .... !! ☺️👍 काल पहाटेच आम्ही नेहमीची मित्रमंडळी ठरल्या प्रमाणे, दोघे आपापल्या सायकली घेऊन कसब्यातून ( #दीपक_हिरवे अन #अस्मादिक ) निघालो, आणि थेट सिंहगड रोड ला लागलो, पुढे राजाराम पुलापाशी मात्र नव्यानेच...