*या हंगामातील पहिला वहिला पावसाळी ट्रेक ..*

पावसाळी सिझन मधील माझा पहिला वहिला मध्यम वॉकिंग ट्रेक कम भटकंती @ ९ किमी. @ शिवाजी नगर, वेताळ टेकडी ते कोथरूड म्हातोबा मंदिर आणि परत .. !!

मागील आठवड्यात आम्ही दोघांनी पहिल्यांदा च मोठा रेंज ट्रेक केला होता शिवाजी नगर, वेताळ टेकडी ते बावधन रोड नि परत, ज्याची पोस्ट मी शेयर केली होती तोच सेम रूट मी आणखीन ऐका नवीन उत्साही मित्राला घेऊन आम्ही तिघांनी परत एकदा शनिवारी पहाटे केला होता @ १४ किमी.. !!

नंतर सेम रूट, रविवारी संध्याकाळी मिसेस बरोबर अर्धा केला होता @ ६ किमी..


आणि फायनली, आम्ही, #मी व वेताळटेकडी जवळ राहणारे आमचे मित्र #सुधीर_राणे, असे आम्ही दोघांनी ठरवून कालचा दिवस फायनल केला होता, बरोबर दुपारनंतर ४ "वाजता अगदी सेम रूट @ १४ "किमी परत एकदा करायचा असे ठरवून आम्ही निघालो .. !!


वेताळ टेकडी वर येतानाच, सगळे काही व्यवस्थित असतानाच, अचानक पणे, हाय रे दैवा, असा काही धो धो पाऊस सुरू झाला होता की विचारता सोय नाही असे झाले होते ..!!

आम्ही दोघेही क्षणभर बुचकळ्यात पडलो होतो की आता काय करायचे, माघार घायची काय परंतु अगदी दोन क्षणच असे झाले, कारण, आम्ही आधीपासूनच ठामपणे ठरवले होते त्यामुळे अगदी निर्धाराने, सोबत पावसाचे काहीही साधन, ना छत्री, ना टोपी ना जर्किंन, असे काहीही नसतांना, आहे त्या परिस्थितीत आम्ही त्या धो धो पावसांत पुढे जायचे ठरवले आणि निघालो .. !! ☺️👍

सुरुवातीला सातत्याने पावसाने अगदी जोरदार आसमंतातुन गोलंदाजी सुरू केली होती, आमच्या वर त्याने सर्व प्रकारची बॉलिंग करून बघितली, सुरुवातीला अगदी वेगवान गोलंदाजी केली, नंतर नंतर थोडी मध्यम गती गोलंदाजी आणि मधे मधे फिरकी देखील घेतली त्याने, परंतु आम्ही दोघेही बधलो नव्हतो की आऊट देखील झालो नव्हतो .. !! ☺️👍


पाऊस सातत्याने दमदार पणे गोलंदाजी करत होता आणि आम्हीही टुकू टुकू करत आमच्या फलंदाजी मध्ये सातत्य ठेवत, शांत पणे पण संयमी फलंदाजी करत होतो, आम्ही सलग १ तासभर चाललो आणि कोथरूड चे म्हातोबा मंदिर गाठले, तोवर आम्ही दोघेही चंद्रचिंब आंतर्बाह्य भिजलेलो होतो, परंतु सातत्याने वेगाने चालत असल्याने, अंगात भिजल्याने थंडी किंवा हुडहुडी नव्हती भरलेली हे नशीब ..!!


परंतु वाटेने चालताना, पाऊल वाटेवर नेहमीच्या रस्त्याला येवढा चिखल झाला होता, की पायाखाली आमच्या बुटांना डबल लेयर चा चिखल चिकटून, आमचे शूज डबल वजनाचे झाले होते, अतिशय जड झालेले होते, जेणेकरुन वेगाने चालणे जिकिरीचे झाले होते .. !!  


गम्मत म्हणजे, याआधी बऱ्याचदा आम्ही ट्रेकदरम्यान, रानात, नजरे समोर, गुरांना पावसाळ्यात चालताना पाहिले होते, अगदी चिखलाने भरलेल्या रस्त्याने चालताना, त्यांच्या पायांच्या खुराने चिखल असा मागून हवेत उडायचा, अगदी तस्सेच आमचे देखील होत होते, आमचे देखील बूट इतके चिखलाने गच्च भिजले होते की जास्तीचा चिखल, झपझप चालताना, पाय उचलला की मागे मस्त हवेत चिखल उडायचा, मागे पायांना, माझ्या बुटांत आतल्या बाजूमध्ये जाऊन पडायचा, मागे अगदी कंबरे पर्यंत, पॅन्ट वर आणि थोडाफार टीशर्ट ला देखील चिखलाचा प्रसाद मिळाला होता, बुटाच्या आतील पांढरे शुभ्र मोजे देखील पूर्ण चिखलाने माखले होते, आणि या साऱ्यामुळे चालण्याचा वेग थोडा मंदावला होता .. !!

 

आम्ही दोघेही पूर्ण नखशिखान्त भिजलो होतो, तरीही वेगाने चालण्याचा प्रयत्न करत होतो, त्यामुळे शरीराचे आतून तापमान गरमच राहत होते, हुडहुडी नव्हती भरत, थंडी नव्हती वाजत तसेच मनाचा हिय्या करून पुढे कोथरूड पर्यंत गेलो, म्हातोबा मंदिर गाठले,

वर डोक्यावर धो धो पाऊस कोसळत होता,【आमच्या पूर्ण जाण्याच्या आणि येण्याच्या वाटेवर, त्यावेळी त्या पूर्ण भूप्रदेशात, आम्हाला, एकही चिटपाखरू नाही दिसले, त्यामुळे मनुष्यप्राणी नाही दिसला याचेही आश्चर्य नाही वाटले, येवढ्या भन्नाट धो धो पावसांत, चिखलाच्या वाटेने कोण बरे हा वेडेपणा करणार होते .. !! ☺️ 】आता इथून पुढे बावधन पर्यंत तर पूर्णपणे चिखलमय प्रदेश होता तेंव्हा सुज्ञ विचार केला आणि परत माघारी फिरलो, परतीच्या मार्गात बदल करून, अंतर वाढविण्याच्या दृष्टीने पूर्ण खाण पालथी घातली, तिला चौफेर फिरलो, खाणीच्या मागील बाजूने फिरताना मात्र एकेठिकाणी मोठी घळ लागते ज्यामुळे कंपल्सरी उजवीकडे खाणीमध्ये आतील बाजूस, खाली उतरावे लागते व पुन्हा लगेचच वर चढून पुढे जावे लागते, एकूण आम्ही सलगपणे *#अडीच_तास, #तब्बल ९ #कीमी._वॉकिंग* केले, आणि मगच समाधानाने घरचा रस्ता पकडला .. !! ☺️👍


परतीच्या मार्गावर मात्र सुरुवातीला इतकावेळ आसमंतातून जोशपूर्ण गोलंदाजी करत होता, तोच हा पाऊस, आता मात्र आमची अभेद्य फलंदाजी पाहून नामोहरम झाला होता आणि चक्क त्याने माघार घेतली आणि आम्हांला सरतेशेवटी, वेताळ टेकडी पायथ्याला परत आल्यावर उन्हाने दर्शन दिले .. !! ☺️☺️


 आयुष्यात अगदी प्रथमच हा असा अनुभव घेतला, येवढ्या धो धो पावसात आणि येवढ्या चिखलात, डबल वजनाच्या बुटाने ( चिखला सहित ) येवढे सलग अडीच तास चाललो होतो, इतर वेळी, ट्रेक ला, येवढ्या धो धो पावसात आम्ही थोडा वेळ थांबून राहतो .. ☺️👍

पण कालचा हा अनुभव, नक्कीच आयुष्याच्या सुवर्ण स्मृतिपटलावर कायमचा नोंदवला जाणार आहे  हे निश्चितच .. !! ☺️👍


शॉर्ट, टीशर्ट पूर्ण चिखलाने मळले होते, परंतु जाम मजा आली होती वॉकिंग ला, थोडीशी मनामध्ये भीती वाटत होती की येवढे चंद्रचिंब पावसात भिजल्याने जर आजारी पडलो तर, सुदैवाने तसे काही घडले नाही, घरी आलो, गरम पाण्याने आंघोळ केली, मस्तपैकी अगदी व्यवस्थित वाफ घेतली आणि दुसऱ्या दिवशी नेहमीची दैनंदिनी सुरू देखील झाली.. ! ☺️👍


मागच्या आठवड्यातील बुधवार ते कालचा बुधवार, आम्ही ४ वेळा वेताळ टेकडी केली, दोनदा 

१४ - १४ किमी वॉकिंग केली ( ४ तास चालणे ), एकदा ६ किमी, विथ फॅमिली वॉकिंग झाली आणि कालचे ९ किमी वॉकिंग झाले .. !! ☺️👍💪🏻


आता रविवारी पुन्हा १४ "किमी वॉकिंग चा आणि बावधन ला रस्त्याला शिवून येण्याचा प्लॅन आहे, जो खरेतर कालच ठरवला होता, परंतु पावसाने बदल झाला.. .. ! ☺️


भेटू यात मित्रहो, अशाच एका मजेदार वळणावर .... !!

 ☺️👍


*#ट्रेकिंग_करा..*

*#हायकिंग_करा..*

*#सायकल_चालवा..*

*#चिरतरुण_रहा..*      

*#झाडे_लावा..*

*#पर्यावरण_वाचवा..*


🚴‍♂️🚴‍♂️🧗‍♂️🧗‍♂️🌳🌿


*#प्रविण_दुधाने..*

*#प्रॅक्टीस_वेताळटेकडी_बावधन_पाषाण_शिवाजीनगर..*

*#एक_सह्यवेडा..*

*#फक्त_सह्याद्री..*

*#हॅपी_ट्रेकर्स_फॉरेव्हर_गृप..*

*#फक्त_मराठा_गृप..*

*#ट्रेकिंग_अँड_सायकलिंग..*

*#सायकल_मित्र_परिवार..*

*#धर_हँडल_मार_पॅडल_ग्रुप..*

*#सह्याद्री #भटकंती #सह्यकडा..* 

*#सायकलिस्ट..*

*#महाराष्ट्र #महाराष्ट्रदेशा..* 

*#आम्ही_भटके* *#महाराष्ट्रदेशाचे..*

*#महाराष्ट्रमाझा..*

*#मी_महाराष्ट्राचा..*

*#जय_शिवराय_जय_महाराष्ट्र..*

                                                     एक भटक्या ..

                                          ब्लॉगर प्रविण दुधाने ..

                                         मो.नं. ९८८१००१९५६

Comments